बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर येथील मुलींच्या वस्तीगृहातील एका नर्सिंग विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नांव सुमित्रा गोकाक (वय 19) असे आहे. सदाशिवनगर, बेळगाव येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सरकारी मॅट्रिकपूर्व मुलींच्या वसतीगृहात ती रहात होती.
सकाळी नाश्ता करून आपल्या खोलीत गेलेल्या सुमित्राने दरवाजा आतून लॉक करून आत्महत्या केली. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेली सुमित्रा महिनाभरापूर्वी वसतीगृहात वास्तव्यास आली होती.
तिच्या आत्महत्येमुळे वसतीगृहातील मुलींमध्ये खळबळ उडाली आहे एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून प्रकरणाची पोलिसात नोंद झाली आहे.



