बेळगाव लाईव्ह :गोकुळनगर चौथा क्रॉस, महात्मा फुले रोड, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकाला अटक करून शहापूर पोलिसांनी त्याच्याकडील 30 हजार रुपये किमतीच्या 15.98 ग्रॅम हेरॉईनसह एकूण 75 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विनायक रामा जारटकर (रा. समर्थनगर, बेळगाव) असे आहे. शहापूर पोलिसांनी विनायक याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे
15.98 ग्रॅम हेरॉईन, 30 हजार हिरो वंडर प्लस मोटरसायकल, 15 हजार रुपयांचा मोबाईल आणि 950 रुपये रोख असा एकूण 75 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस चौकशीत आरोपी विनायक याने सायन, मुंबई येथील अल्मा उर्फ राणी या महिलेकडून हिरोईन खरेदी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.





