belgaum

संकटग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी मंत्री निवडणुकीत व्यस्त -कडाडी यांची टीका

0
33
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे नुकसान होऊन संकटात सापडलेल्या बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून राज्य सरकार जनगणनेत आणि जिल्ह्यातील मंत्री वीज संघ व साखर कारखान्यांच्या निवडणुकीत गुंतले आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.

बेळगाव शहरात आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एसडीआरएफ किंवा एनडीआरएफ नियमानुसार मिळणारा निधी देखील अद्यापपर्यंत दिलेला नाही, असा आरोप करून राज्यसभा सदस्य कडाडी म्हणाली की, निवडणुकीच्या मोठ्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडेही लक्ष द्यावे.

शेत पिकांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावया असावी, जिल्हा पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करावयास हवी. तात्काळ नुकसान भरपाई निधी वितरित करावयास हवा. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराकडे आतापर्यंत फक्त प्रत्येक एक कोटी धाडण्यात आले असून उर्वरित निधी वितरित झालेला नाही.

 belgaum

जिल्ह्यातील शेत पिकांच्या नुकसानीचा अहवाल आम्ही सरकारकडे धाडला आहे. सरकारकडून निधी मंजूर होताच आम्ही तो तात्काळ लाभार्थींपर्यंत पोहोचू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माझं म्हणणं आहे की जिल्ह्याचे कामकाज चालवणारे मंत्री जे आपल्या जिल्ह्यासाठी दोघेजण आहेत.

त्यांनी याकडे लक्ष द्यावयास हवे, पण तसे घडत नाही केडीपी बैठक दर तीन महिन्यात तीन एकदा व्हावयास हवी मात्र बेळगावमध्ये गेल्या मे महिन्यानंतर ती झालेलीच नाही. सर्वजण निवडणुकांमध्ये व्यस्त झाले आहेत. जिल्हा पालकमंत्री हुकेरी विद्युत संघाच्या निवडणुकीत तर महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री मलाप्रभा साखर कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. दुसरीकडे सरकारकडून निधी वितरित केला जात नाही आहे. त्यामुळे सरकारकडे निधीची तर कमतरता नाही ना? अशी शंका येते. तेंव्हा मुख्यमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पालकमंत्री याची गांभीर्याने दखल घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हा पालक मंत्र्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची, त्यांचे हित जपण्याची सक्त सूचना करावी.

परवा मी पूर परिस्थितीने ग्रासलेल्या विजापूरमध्ये चौकशी केली, त्यावेळी तेथील जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी अद्याप पूरग्रस्त भागाला भेट दिली नसल्याचे कळाले. असे पालकमंत्री जनतेला काय न्याय देणार? एकंदर राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेल्या सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई तात्काळ वितरित करावी, असे कडाडी म्हणाले

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच लवकरात लवकर त्यांच्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव दिला जावा. सध्या इतका पाऊस होत असताना कृषी खात्याने अद्याप शेतकऱ्यांना ताडपत्रीचा पुरवठा केलेला नाही.

याबाबत मी विचारना केली असता, आणखी दोन महिन्यांनी ताडपत्री उपलब्ध होणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यावर या ताडपत्रींचा काय उपयोग? सध्या पावसात शेतकऱ्यांना त्याची गरज आहे असे सांगून एकंदर सुव्यवस्थेत कारभाराची गरज असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी केला. पत्रकार परिषदेस माजी आमदार ॲड. अनिल बेनके माजी आणि आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.