बेळगाव लाईव्ह : भरधाव ट्रकने सिग्नल वर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाला ट्रकने चिरडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.सुनील दिलीप देसाई वय 42 राहणार कापोली खानापूर असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार आरपीडी कॉलेजकडून गोवा वेसच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने सुनील देसाई यांच्या स्प्लेंडर दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील देसाई यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
सणासुदीच्या काळात भर चौकात झालेल्या या अपघातामुळे शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


