बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी म्हैसूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय म्हैसूर दसरा क्रीडा स्पर्धा -2025 मधील ज्युडो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवताना 4 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली. तसेच महिला विभागाची चॅम्पियनशिपही पटकावली.
म्हैसूर येथील महाराजांच्या इनडोअर हॉलमध्ये 22 ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित म्हैसूर दसरा क्रीडा स्पर्धामध्ये बेळगाव येथील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह महिला विभागात चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. पदक विजेत्यांमध्ये सहाना बेळगली -सुवर्ण (57 किलो खालील) राधिका डुकरे -सुवर्ण
(70 किलो खालील), साईश्वरी कोडचवाडलकर -सुवर्ण (78 किलो खालील) भूमिका व्ही.एन. -सुवर्ण (78 किलो वरील) पार्वती अंबाली -रौप्य (63 किलो खालील) सौरभ पाटील -रौप्य (81 किलो खालील) दिलशान नदाफ -कांस्य (60 किलो खालील) अमृता नाईक -कांस्य (48 किलो खालील) सौरभ भाविकट्टी -कांस्य पदक (66 किलो खालील) यांचा समावेश आहे.
युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याचे बेळगाव जिल्हा उपसंचालक श्रीनिवास बी. यांच्या सतत सहकार्याने ज्युडो प्रशिक्षक सुश्री रोहिणी पाटील आणि सुश्री कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त ज्युडो खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यस्तरीय स्पर्धेतील वरील ज्युडो खेळाडूंचे यश हे युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या (डीवायईएस) अढळ पाठिंब्याचे प्रतीक आहे.



