बेळगाव लाईव्ह : जांबोटी जवळील हुळंद गावाजवळ असलेल्या माळ रानात अस्वलाने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून जखमी अवस्थेत शेतकऱ्याला उपचारासाठी बेळगावात दाखल करण्यात आले आहे.
वासुदेव गावडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
खानापूर तालुक्यातील हुळंद या ठिकाणी आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्यावर गावापासून काही अंतरावर असलेल्या माळरानावर अस्वलाने हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वासुदेव गावडे हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे. ही बातमी फॉरेस्ट खात्याला समजताच फॉरेस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सदर गंभीर जखमीला जांबोटी या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही माध्यमांनी वासुदेव गावडे यांचा डोळा निकामी झाल्याचे वृत्तप्रसारित करण्यात आले आहे. परंतु फॉरेस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, अजून तसा काही रिपोर्ट आला नाही.रिपोर्ट आल्यानंतरच डोळ्याबाबत समजणार आहे, असे सांगितले.
अस्वलाच्या हल्ल्यात हुळंद येथील शेतकरी गंभीर जखमी. डोळा निकामी झाल्याचे खोटं वृत प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करण्यात येऊ शकते असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.



