बेळगाव लाईव्ह: रायबाग तालुक्यातील कुडचीकडून हैद्राबादकडे गोमांसाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी संताप व्यक्त करून चक्क लॉरीलाच आग लावल्याची घटना कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे सोमवारी रात्री घडली.
एनापूर येथील उगार रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास नागरिकांनी लारीला अडवले.
चालकाची चौकशी करून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लारीला थेट आग लावली.
पोलिस येईपर्यंत लारी पूर्णतः जळून खाक झाली. लारीमध्ये तब्बल पाच टनांहून अधिक गोमांस असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिस ठाण्याचे पीएसआय राघवेंद्र खोते व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच उगार साखर कारखाना व अथणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.




