बेळगाव लाईव्ह : सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ सुरू असतानाच 25 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात सोमवारी घडली आहे.
मल्लिक हुसेन किल्लेदार (वय 25) असे या मयत युवकाचे नाव आहे. हुक्केरी पेठेत मोटारसायकलवरून जात असताना दोन संशयितांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येचे दृश्य स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
भर-दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी श्यानूर जमखंडी (वय 24) आणि बशीर किल्लेदार (38) या दोघांना पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे.


