बेळगाव लाईव्ह : शेतकरी कुटुंबात भलेही जन्म घेतला असला तरी बांधकाम, वस्त्रोद्योग, व्यापार क्षेत्रात अभिनव प्रयोग गंगाधर (बाळू) बिर्जे यांनी करून आपली छाप पाडली. शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर स्वतःचे व्यक्तीमत्व घडविले. त्यांच्या अकाली निधनाने समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना गंगाधर बिर्जे यांच्या शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या.
वडगावातील ज्ञानेश्वर मंदिरात बुधवारी (ता.६) शोकसभा आयोजित करण्यात आली होती. शोक सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर होते . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. गंगाधर बिर्जे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. गणेशोत्सव, शिवजयंती, भजनी मंडळे आणि वारकरी सांप्रदाय अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे सहकार्य मिळायचे.
मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी बांधकाम क्षेत्रात विशेष योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले.

माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, कृषी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तानाजी भोसले, जेष्ठ पंच आनंदा बिर्जे, म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, एपीएमसीचे माजी अध्यक्ष मनोहर होसूरकर व्यासपीठावर उपस्थित होते. नारायण बालेकुंद्री, वकील शंकर हादीमनी, नितीन खन्नूकर, विजय अष्टेकर, नारायण बाळेकुंद्री, जितेंद्र चौगुले, ऐश्वर्या बिर्जे, सुभाष घोलप, नवहिंद चेयरमेन प्रकाश अष्टेकर ,संतोष शिवनगेकर ,यल्लाप्पा नागोजीचे ,दत्ता उघाड़े यांनी विचार मांडले. संदीप खन्नूकर यांनी सूत्रसंचालन केले.


