बेळगाव लाईव्ह: नंदगड (ता. खानापूर) येथील कुंभार गल्लीतील सात वर्षीय बालक वेदांत सतीश कुंभार याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
वेदांतला सर्पदंश झाला होता. तात्काळ त्याला उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वेदांतचे वडील सतीश कुंभार हे गवंडी कामगार असून, वेदांतच्या पश्चात आई-वडील व दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

