बेळगाव लाईव्ह :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुपर स्पेशालिटीला विलंब झाल्याची कबूली पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्हा रुग्णालयातील नवीन सुपर-स्पेशालिटी विभाग डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे उशिरा सुरू होत आहे असेही जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटलंय.
जिल्हा रुग्णालयात (बिम्स) सुपर स्पेशालिटी वगळता कांही विभाग सुरू झाले आहेत. सुपर स्पेशालिटी सुविधा खाजगी ऑपरेटर्सना दिली जाणार नाही. ती जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याद्वारे व्यवस्थापित केली जाऊ शकते. लवकरच तिचे उद्घाटन होईल, असे मंत्री जारकीहोळी यांनी पुढे सांगितले.


