बेळगाव लाईव्ह: सवदत्ती तालुक्यातील एका धार्मिक स्थळावर मौलवीकडून ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
ही घटना ५ ऑक्टोबर २०२३ रोजी बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळावर घडली होती. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलेली माहिती असलेला व्हिडिओ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पुनीत केरिहळ्ळी यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
या प्रकरणात महालिंगपूर येथील रहिवासी तुफेद दादाफीर (वय २२) याला पोलिसांनी अटक केली असून, हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात पाठवले आहे. पीडितेच्या वडिलांच्या मते, घटना घडल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता.
एफआयआर दाखल करू नये म्हणून दबाव आणण्यात आला होता आणि आरोपीला स्थलांतरित करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
मुरगोड पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या सहकार्याने व्हिडिओला पुरावा मानत अधिकृत गुन्हा नोंदवला असून, आरोपीला अटक करून सखोल तपास सुरू केला आहे.




