बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या 2025 -26 सालातील बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित), एम.बी.ए. (ऑनलाईन मोड) या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे.
शिक्षण अपूर्ण झालेल्यांकरिता उपरोक्त पदवी व पदव्युत्तर शिक्षण दुरस्थ व ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या उद्बोधन शिबिराचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे यांनी केले आहे.



