आमदार विठ्ठल हलगेकर लढवणार डीसीसी बँक निवडणूक

0
4
Vitthal halgekar
 belgaum

बेळगाव लाईव्ह: पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची खानापूरच्या डीसीसी बँक निवडणुकीतून माघार घेतली असे वक्तव्य केल्यानंतर खानापुरात पुन्हा एकदा राजकीय चक्रे जोरदार फिरू लागले असून हट्टीहोळी यांच्यानंतर विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर हे निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँक निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर रिंगणात उतरणार आहेत.सदर माहिती खानापूर सर्व पक्षीय प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी गुरुवारी खानापूर येथील शांतिनिकेतन विद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत  सदर उमेदवारी जाहीर केली.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएस अध्यक्ष राजू सिद्दाणी, समाजसेवक इरफान तालीकोटी, शिवसेना नेते पी.के. पाटील, पीकेपीएस अध्यक्ष लक्ष्मण कसरलेकर, महादेव घाडी, भर्माणी पाटील, लैला शुगर एम.डी. सदानंद पाटील, इटगी पीकेपीएस अध्यक्ष श्रीशैल तुरमुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 belgaum
z ganesh
z ganesh
z ganesh
z ganesh

पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत बिर्जे म्हणाले, “डीसीसी बँक निवडणुकीसाठी उमेदवार निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडे विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर आणि समाजसेवक राजीव सिद्दाणी यांची नावे आली होती. मात्र 27 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून चन्नराज हट्टिहोळी यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती मिळाली. त्यामुळे उरलेल्या उमेदवारांमध्ये आमदार हलगेकर आणि सिद्दाणी यांच्या बाबतीत झालेल्या चर्चेनंतर  आमदार हलगेकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीत एकूण 55 पीकेपीएस सहकारी संस्था मतदानास पात्र असून बहुमतासाठी किमान 28 संस्थांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या आमच्याकडे 35 संस्थांचा पाठिंबा असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे,” असे  बिर्जे यांनी स्पष्ट केले.

मागील डीसीसी बँक निवडणुकीत विद्यमान आमदार म्हणजेच तत्कालीन आमदार अंजली निंबाळकर विरोधात अरविंद पाटील अशी लढत झाली होती त्यात अरविंद पाटील यांनी बाजी मारली होती आताही जर विद्यमान आमदार विरुद्ध अरविंद पाटील अशी लढत झाली तर चुरस वाढणार आहे मात्र अरविंद पाटील यांची बाजू वरचढ आहे असे सध्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.