बेळगाव लाईव्ह – “केवळ मद्यपानाने यकृत खराब होत नाही तर चुकीच्या जीवनशैलीमुळेही ते खराब होत असते. वेळीअवेळी खाणेपिणे, झोपणे व व्यायामाचा अभाव यामुळे सर्वसामान्य माणसांचही यकृत खराब झालेले दिसते. त्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे ” असे मत प्रसिद्ध गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ संतोष हजारे यांनी मांडले.
- आपल्या जेवणात साखरेचे प्रमाण सुद्धा कमी ठेवावे असाही सल्ला त्यांनी दिला.वेळोवेळी तपासणी करून घेतली तर धोका टळू शकतो असेही ते म्हणाले.
- शनिवारी जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम मेन आणि कोनवाळ गल्लीच्या सिंहगर्जना युवक मंडळाच्या वतीने व केएलई हॉस्पीटलच्या सहकार्याने आयोजित पोट, आतडी व यकृत संदर्भात आरोग्य तपासणी शिबिर उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
- यावेळी व्यासपीठावर माजी महापौर सरिता पाटील, सिंहगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अभिजीत सुनगार, जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, तसेच उपक्रम प्रमुख प्रदीप चव्हाण उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत माजी अध्यक्ष अनंत लाड यांनी केले. त्यानंतर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते डॉ हजारे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांचा तसेच शिबिरातील इतर सहकारी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
- माजी महापौर सरिता पाटील यांनी बोलताना जायंट्स ग्रुपने आपल्या प्रभागात अशा प्रकारचे एक चांगले शिबिर आयोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
- शेवटी अध्यक्षीय समारोप करताना डॉ संतोष हजारे आणि केएलई हॉस्पीटलचे आभार मानले.
- कोनवाळ गल्ली येथील सुनगार हॉल येथे
- आयोजित या शिबिरात १२० नागरिकांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. नावे नोंदणीनंतर वजन, उंची, रक्त तपासणी, रक्तदाब या चाचण्या करून एका विशिष्ट मशीनवर यकृताची तपासणी करण्यात आली. त्यानंतर स्वतः डॉ हजारे व इतर सहकारी डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाला वैयक्तिकरीत्या सदृढ यकृत कसे राखता येईल , यासाठी आहार विहार आणि व्यायाम याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
- दिवसभर सुरू असलेले हे भव्य वैद्यकीय शिबिर यशस्वी करण्यासाठी जायंट्स मेनचे पदाधिकारी, सदस्य तसेचसिंहगर्जना युवक मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले तर सचिव मुकुंद महागावकर यांनी सूत्रसंचालन केले.

