बेळगाव लाईव्ह : सालाबाद प्रमाणे लक्ष्य फाउंडेशन आणि मनध्वनी कन्नड दैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:45 वाजता कन्नड भवन बेळगाव येथे ‘युथ अँड नेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक मंजुनाथ बाबुराव गड्डेन्नवर यांनी दिली.
शहरामध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मंजुनाथ गड्डेन्नवर यांनी ‘युथ अँड नेशन’ अर्थात युवा पिढी आणि देश या आमच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सध्याची आपली युवा पिढी जी भरकटली आहे व्यसनाधीन होत आहे त्यांना उज्वल भविष्याचा योग्य मार्ग दाखवणे हा आहे. तसेच देशाच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांच्या लक्षात आणून देणे हा आहे.
एकंदर आमचा हा कार्यक्रम संपूर्णपणे युवा पिढीवर केंद्रीत असणार आहे. आजच्या युवा पिढीने भरकटून न जाता देशाच्या प्रगती उत्कर्षाच्या दृष्टीने कार्यरत राहून भविष्यातील यशस्वी डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक वगैरे बनावे हा युथ अँड नेशन या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मूळ हेतू आहे, अशी माहिती देऊन सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद उपस्थित राहणार आहेत, असे मंजुनाथ यांनी सांगितले.
जीवनात शिक्षण किती महत्त्वाचे आहे गैरमार्गाला न लागता स्वतःचा आणि देशाचा विकास आपण कसा करू शकतो आत्ताचे युवक कसे देशाचे भविष्य आहेत. आज-कालचे विद्यार्थी -विद्यार्थिनी दिशाहीन होताना पहावयास मिळत आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नको त्या गोष्टींमध्ये त्यांचा रस वाढत आहे. ते व्यसनाधीन होत आहेत. बिघडलेली मानसिकता ठीक करून आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या युथ अँड नेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहरूनगर येथील शेख कॉलेज जळील कन्नड भवन येथे येत्या बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:45 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 8123147355 अथवा 6363444423 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्य फाउंडेशन आणि मनध्वनी कन्नड दैनिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




