बेळगाव: माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना झालेल्या शिक्षेप्रकरणी त्यांचे कुटुंबीय कायदेशीर लढाई लढू शकतात, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे.
शनिवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत जे व्हायचे ते होईल, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही.
यावेळी, काँग्रेस आमदार राजू कागे यांच्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेट्टर म्हणाले की, ‘काल डॉ. प्रभाकर कोरे यांचा वाढदिवस होता, त्यामुळे अनेक नेते आले होते.
त्याच निमित्ताने मी राजू कागे यांना भेटलो. त्यात काहीही विशेष नाही.’ राजू कागे यांची सरकारवर असलेली नाराजी ही त्यांची वैयक्तिक बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




