महाराष्ट्रातून बेळगावकडे येणारा 50 किलो गांजा जप्तसहा जण अटकेत

0
13
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अमली पदार्थ तस्करी विरोधी मोहीमेत बेळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले असून महाराष्ट्रातून कारमधून बेळगावकडे आणण्यात येणारा 50 किलो गांजा बेळगाव पोलिसांनी जप्त केला आहे.

बेळगाव जवळ सुळगा (हिं.) गावा जवळील एका हॉटेल जवळ एका कारची तपासणी केली असता सुमारे ५० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात करून त्यांच्या जवळील गांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

इस्माईल उर्फ सद्दाम बाबू सय्यद (वय ३५, कणगला येथील करजगा रोड, ता. हुक्केरी, जिल्हा बेळगाव), ताजीर गुडूसाब बस्तवाडे (वय २९, रा. जयंतीनगर, कणगला), प्रथमेश दिलीप लाड (वय २९, महागाव, गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र), तेजस भीमराव वाजरे (वय २१, रा. जयंतीनगर, कणगला), शिवकुमार बाळकृष्ण असबे (वय २९, महागाव), रमजान दस्तगीर जमादार (वय ३४, लक्ष्मी गल्ली कणगला, सध्या कोरेगाव,सातारा, महाराष्ट्र) या धाडीत अटक केलेल्यांची नावे आहेत.

 belgaum

महाराष्ट्रातून दोन कारमधून बेळगावला येत असलेल्या गांजा रॅकेटमधील इस्माईल आणि ताजीर या दोन आरोपींना थांबवून तपासणी करण्यात आली तेव्हा सर्वात मोठे गांजा रॅकेट उघडकीस आले.  हे सहाजण ४५ किलो गांजा बाळगताना पकडले गेले. त्यांच्याकडून पोलिसांनी १० मोबाईल फोन, एक चाकू, एक वजन यंत्र, ४००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन कार आणि ५० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

प्रथमच पोलिसांनी गांजा विक्री नेटवर्कचा मुख्य आरोपी आणि दलाल इस्माईल उर्फ सद्दाम याला अटक केली आहे. तो मध्य प्रदेश आणि ओडिशामधून गांजा आणून विकत होता आणि पुणे आणि मुंबईमधून हेरॉईन पुरवत होता अशी माहिती आहे. त्यांनी सांगितले की, हा गांजा छापा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक आहे.

सीईएन निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस  निरीक्षक गड्डेकर यांनी प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी मुंबई आणि इतर शहरांचा दौरा केला, विश्वसनीय माहिती गोळा केली, हल्ल्याची योजना आखली आणि अखेर एक मोठा समाजविरोधी कृत्य उधळण्यात यश आले. त्यांनी प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या पथकाला बक्षीसही जाहीर केले आहे.

तीन वर्षात याच वर्षे सर्वाधिक गांजा जप्त

2023 मध्ये बेळगाव पोलिसांनी एका वर्षात 12 किलो 679 ग्राम गांजा जप्त केला होता 2024  साली 11 किलो 788 ग्राम तर या 2025 ऑगस्ट पर्यंत  102किलो 897ग्राम गेल्या तीन वर्षातला सर्वाधिक गांजा जप्त केला आहे. जळगाव पोलिसांनी गेल्या आठ महिन्यात 44 प्रकरणांमधून 104 जणांवर  गुन्हा दाखल करत करत 97 जणांना अटक केली आहे अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.