बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मार्केट आणि माळमारुती पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत विजय संजय कवीलाकर (रा. समर्थ नगर, बेळगाव), विनायक परशुराम गडकरी (रा. लक्ष्मी गल्ली, सुळगा, ता. बेळगाव), सिदराय बसप्पा कुपनी उर्फ नाईक (रा. पणगुत्ती), बसवराज फकीरप्पा नाईक (रा. गुटगुद्दी, ता. हुक्केरी) आणि बसवराज सण्णयल्लप्पा उर्फ सण्णकल्लप्पा नाईक (रा. गुटगुद्दी, ता. हुक्केरी) यांना ताब्यात घेण्यात आले.
शहरातील विविध भागांत हे संशयित व्यक्ती संशयास्पद वर्तन करत असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत त्यांनी गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.




मार्केट पोलिस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावण्णवर आणि माळमारुती पोलिस ठाण्याचे पीएसआय श्रीशैल हुलगिरी, पी. एम. मोहिते व यू. टी. पाटील यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
या यशस्वी कारवाईसाठी पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.





