बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये कर्नाटक राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेचे पहिले जिल्हास्तरीय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित कर्नाटक राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेच्या पहिल्या जिल्हास्तरीय संमेलनात कामगारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना खजिनदार जी. व्ही. कुलकर्णी यांनी बेळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेतला. कामगारांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने करण्यात आली आहेत.
ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय तर ४ ऑक्टोबर रोजी राजस्थानमध्ये अखिल भारतीय बांधकाम कामगार संघटनेचे संमेलन होणार आहे.
लोकशाही मार्गाने कामगारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांपर्यंत विविध सुविधा पोहोचवण्यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
या संमेलनाला राज्याध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, नागप्पा संगोल्ली, दिलीप वाळके, सिटूचे अध्यक्ष गैबु जैनेखान, जी. व्ही. कुलकर्णी, राजू पाटील आणि मंदा नेवगी, वैशाली धुमाळे, तुकाराम यांच्यासह इमारत आणि बांधकाम संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


