belgaum

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप दंड

0
16
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि तीस हजार रुपयांचा दंड देण्याचा आदेश बेळगाव पोक्सो न्यायालयाने बजावला आहे.

खानापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या प्रकरणाची सुनावणी बेळगाव येथील माननीय विशेष POCSO न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणाबाबत समजलेले अधिक माहितीनुसार खानापूर संगरगाळी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) या इसमाने 2024 साली एका अप्राप्त मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले होते. या घटनेबाबत खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 belgaum

या प्रकरणाचा तपास रामचंद्र नाईक (पोलिस निरीक्षक, खानापूर पोलीस ठाणे) यांनी केला. त्यांना मंजुनाथ मुसळी (खानापूर पोलिस ठाणे) यांनी तपास सहाय्यक म्हणून मदत केली. तसेच न्यायालयीन कामकाजात प्रविण होंदड यांनी कोर्ट ड्युटी अधिकारी म्हणून काम पाहिले.या प्रकरणात सरकार पक्षाचे अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.