बेळगाव लाईव्ह : बेळगावातील महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणाचा तिढा सुटायला तयार नाही.
4 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने हा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आता पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे, पण या ‘तारीख पे तारीख’मुळे बेळगावकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा परिणाम केवळ महापौर आणि नगरसेवकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूकही थांबली आहे.
महानगरपालिकेने या प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे नगर विकास खात्याकडे पाठवूनही, राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने 13 ऑगस्टच्या सुनावणीसाठी त्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
आता 13 ऑगस्ट रोजी तरी या प्रकरणाचा निकाल लागेल अशी आशा आहे. हा निर्णय कधी होणार, याकडे बेळगावातील सर्व नागरिक आणि नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे.




