बेळगाव लाईव्ह :शहराचा समावेश असलेल्या बेळगाव तालुक्यातील 55 गावांचा मास्टर प्लॅन (सीडीपी) तयार करण्यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असली तरी राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याचे नांव जाहीर केले जाणार आहे. सदर मास्टर प्लॅनसाठी बुडाने 1.88 कोटी रुपयांची निविदा काढली होती.
त्याद्वारे जीआयएस-आधारित मास्टर प्लॅन तयार करण्यात तज्ज्ञ असलेल्या सर्वात कमी बोली लावणाऱ्याची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 2023 मध्ये ई-जीएसआय करार रद्द करण्यात आला होता.
मास्टर प्लॅनचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून एका वर्षाच्या आत ते पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान तोपर्यंत संबंधित 55 गावांमधील बिगर-कृषी प्रस्ताव प्रलंबित राहतील, कारण नवीन आराखडा त्यांचा जमीन वापर निश्चित करणार आहे.


