बेळगाव लाईव्ह : इंडिगो एअरलाइन्स येत्या दि. 21 सप्टेंबर 2025 पासून त्यांची सकाळची बेंगलोर -बेळगाव विमान सेवा (फ्लाइट) पुन्हा पूर्ववत सुरू करत असून हे विमान सकाळी 8:25 वाजता निघेल आणि सकाळी 10:10 वाजता पोहोचेल.
याव्यतिरिक्त दिल्ली विमानतळावरील धावपट्टी देखभालीमुळे पर्यायी दिवशी म्हणजे एक दिवसाआड चालणारी बेळगाव -नवी दिल्ली इंडिगो विमान सेवा येत्या दि. 16 सप्टेंबर 2025 पासून तिच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार कार्यरत होणार आहे.
हे विमान सकाळी 9:10 वाजता बेळगाव येथून निघेल आणि सकाळी 11:40 वाजता दिल्लीला पोहोचेल.
बेळगाववासियांच्या हितासाठी सदर विमान सेवा पूर्ववत करण्याच्या खासदार जगदीश शेट्टर यांच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल इंडिगो अधिकाऱ्यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानण्यात आले आहेत.


