बेळगाव बेंगळुरू वंदे भारतचे जल्लोषी स्वागत

0
8
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वर्षभरापासून बहुप्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव बेंगळुरू वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ रविवारी झाला. रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तर रात्री ८:३० वाजता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात या रेल्वेचे स्वागत केले. यावेळी राज्यसभा सदस्य इराना कडाडी आणि माजी खासदार मंगला अंगडी आदी उपस्थित होते.

गेल्या एक वर्ष हुन अधिक काळापासून या रेल्वेचे उद्घाटन प्रतीक्षेत होते हुबळी ते बेंगळुरू वंदे भारत सुरू झाल्या नंतर सदर रेल्वेसेवा बेळगाव पर्यंत वाढवावी अशी मागणीवारंवार झाली होती मात्र तांत्रिककारण देत याला मुहूर्त मिळत नव्हता दरम्यान बेळगाव हुबळीचे राजकारण पेटले होते हुबळीच्या खासदारांवर बेळगावावर अन्याय करत असल्याचा आरोप झाला होता अनेकदा टीका टिप्पण्या झाल्या होत्या अखेर खासदार जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या माध्यमातून बेळगाव बेंगळूर वंदे भारतचे स्वप्न साकार झाले आहे.

बेळगावहून बेंगळुरूला सकाळच्या सत्रात जाण्यासाठी जवळपास ८ तासाचा प्रवास या वंदे भारतच्या माध्यमातून करावा लागणार आहे.

 belgaum

पहाटे ५ : २० मिनिटांनी बेळगावतून वंदेभारत रवाना होणार असून दुपारी१ : ५० मिनिटांनी बंगळुरूला पोहोचणार आहे तर दुपारी २: २० मिनिटांनी परतीचा प्रवास बंगळुरू हुन बेळगावकडे करणार असून रात्री १०: ४० मिनिटांनी सदर रेल्वे बेळगावला पोहोचणार आहे.बेळगाव बंगळुरू साठी एसी एक्झिक्यूटिव्ह तिकीट दर 2930 तर एसी चेअर कार हा तिकीट दर १६३० असे आकारण्यात आले आहे.

बेळगावहून बेंगळूरूला विमान व्यतिरिक्त तात्काळ जाण्यासाठी रेल्वेचा उपयोग बेळगावकरांना होणार आहे.रविवारी रात्री ८ वाजता वंदे भारत बेळगाव स्थानकावर दाखल होताच याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक रेल्वेचे अधिकारी बेळगावचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आमदार या ठिकाणी उपस्थित होते.


बेळगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी माजी खासदार मंगला अंगडी, आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार संजय पाटील भाजप अध्यक्ष (जिल्हा) सुभाष पाटील आदी उपस्थित होते. वंदे भारतच्या स्वागतासाठी बेळगाव मधील भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे बेळगाव स्थानकावर दाखल होताच अनेकांनी प्रवाशांचे स्वागत केले तर कशा पद्धतीने नवीन वंदे भारत बनवली गेली आहे हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.

यावेळी बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव बेंगलोर वंदे भारत सुरू करण्यासाठी आलेल्या अडचणी सांगत कशा पद्धतीने किती भेटी घेतल्यानंतर आताच प्रयत्नानंतर रेल्वे सेवा सुरू झाली कशी सुरू झाली नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.