अवधूत गुप्ते यांची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

0
1
 belgaum

बेळगाव लाईव्ह :”१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या वतीने अशा प्रकारची संगीत भजन स्पर्धा आयोजित करून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेतील भजन ऐकून मला खूप आनंद झाला” असे विचार प्रख्यात गायक, संगीतकार ,चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते यांनी बोलताना व्यक्त केले.
श्री अवधूत गुप्ते हे बेळगावला आले असताना त्यांनी वाचनालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीस मान देऊन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या संगीत भजन स्पर्धेस सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेतील एका गटाने सादर केलेले पहाडी आवाजातील भजन ऐकून ते मंत्रमुग्ध झाले.


उपस्थित रसिकांनी व्यक्त केलेल्या इच्छेखातर त्यांनी “जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं ,देवा तुझ्या नावाचं याड लागलं” हा अभंगही सादर केला . “आजची माझी संध्याकाळ छान झाली, असे सांगून ते म्हणाले की,” केवळ इतिहास महत्त्वाचा नसतो, त्या इतिहासाची प्रतिबिंब वर्तमानात असतात, ती जपून ठेवायची असतात आणि त्यासाठी अशा वाचनालयाची गरज असते.”


वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक करून अवधूत गुप्ते यांचा परिचय करून दिला. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना वाचनालयाचे स्मृतिचिन्ह अर्पण केले व शुभेच्छा दिल्या.

 belgaum


“एका प्रकल्पावर काम करण्यासाठी आम्ही बेळगावात आलो होतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील” असा विश्वास गुप्ते यांनी व्यक्त केला. याप्रसंगी वाचनालयाच्या कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक अभय याळगी, प्रसन्ना हेरेकर, व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर, इतर कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धेचा आज समारोप,
प्रा पी डी पाटील यांची उपस्थिती

बेळगाव-सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप मंगळवार दि. 19 ऑगस्ट रोजी होत आहे.
बेळगाव शहर ,बेळगाव तालुका, खानापूर तालुका व चंदगड तालुक्यातील एकंदर 31 भजनी मंडळांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत सोमवारी सायंकाळपर्यंत पंचवीस संघानी आपली कला सादर केली.
मंगळवारी दुपारी 2 वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार असून त्यामध्ये श्री सिद्धेश्वर संगीत भजन मंडळ निडडल, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी, श्री हरी संगीत कला मंच कल्लेहोळ, श्री संत तुकाराम भजनी मंडळ माणगाव, राम कृष्ण हरी भजनी मंडळ जांबोटी व श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमानी असे एकंदर पुरुषांचे सहा संघ भाग घेणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात प्रा .पी डी पाटील हे “संत साहित्य व समाज प्रबोधन” या विषयावर बोलणार आहेत. या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिर चे अध्यक्ष श्री आप्पासाहेब गुरव हे तर अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे राहणार आहेत.
महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळाना पंधरा हजार,दहा हजार ,आठ हजार, सहा हजार ,पाच हजार , चार हजार,साडेतीन हजार, तीन हजार आणि अडीच हजार अशी नऊ व उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांचे एक अशी एकंदर 10 बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटी वादक व गायक यांना प्रत्येकी रुपये पंधराशे असे दोन्ही गटाला एकत्रित बक्षीस दिली जाणार आहे. सर्वांसाठी खुला प्रवेश असलेल्या या स्पर्धांना उपस्थित राहून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

पी डी पाटील यांचा अल्प परिचय
महात्मा फुले ज्यूनियर कॉलेज, महागाव येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पी डी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दारूबंदी कृती समितीचे समन्वयक म्हणून कार्य केले असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडहिंग्लज तालुका चे कार्याध्यक्ष आहेत. लेक वाचवा अभियानात सक्रिय सहभाग. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर अनेक पुरस्काराचे मानकरी, विविध विषयावर शेकडो व्याख्याने. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सुपरीचित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.