बेळगाव लाईव्ह : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील चार खटल्यांमध्ये महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. बेळगावच्या दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयासमोर आज, बुधवारी, या प्रकरणातील तपास अधिकारी एच. शेखराप्पा आणि फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. यासह, या खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या खटल्यांमध्ये एकूण ४२ आरोपी होते, त्यापैकी ७ जणांना वगळण्यात आले असून, ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ३२ आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे.
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलकाशी संबंधित एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते, त्यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला आहे. उर्वरित चार खटल्यांमधील कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे.
न्यायालयाने आरोपींच्या जबाबासाठी पुढील सुनावणीची तारीख २८ जुलै २०२५ दिली आहे. आरोपींच्या बाजूने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. श्याम पाटील हे कामकाज पाहत आहेत.यावेळी ऍड मारुती कामानाचे उपस्थित होते.


