मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा

0
17
Railways station
Railways station belgaum
 belgaum

बेळगाव लाईव्ह: नैऋत्य रेल्वेने कार्यान्वयन आवश्यकता लक्षात घेऊन येत्या शुक्रवार दि. 18 जुलै 2025 पासून मिरज-बेळगाव दैनिक अनारक्षित विशेष रेल्वे आणि मिरज-लोंढा डेली पॅसेंजर रेल्वे या दोन रेल्वे सेवांच्या वेळेत सुधारणा केली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

रेल्वे क्र. 07304 मिरज-बेळगाव दैनंदिन अनारक्षित विशेष रेल्वे गाडीच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. ही गाडी आता मिरजहून संध्याकाळी 7:10 वाजता निघेल आणि रात्री 10:25 वाजता बेळगावला पोहोचेल. यादरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील आगमन/निर्गमनाच्या सुधारित वेळा पुढीलप्रमाणे आहेत. विजयनगर 7:20/7:21 वाजता, शेडबाळ 7:32/7:33 वाजता, उगार खुर्द 7:44/7:45 वाजता, कुडची 7:55/7:56 वाजता, चिंचली 8:06/8:07 वाजता, रायबाग 8:19/8:20 वाजता, चिक्कोडी रोड 8:34/8:35 वाजता, बागेवाडी थांबा 8:44/8:45 वाजता, घटप्रभा 8:53/8:55 वाजता, गोकाक रोड 9:04/9:05 वाजता, पारकनहट्टी थांबा 9:14/9:15 वाजता, पाच्छापूर 9:23/9:24 वाजता, सुळधाळ 9:34/9:35 वाजता, सुळेभावी 9:48/9:49 वाजता आणि सांबरा 9:59/10:00वाजता.

त्याचप्रमाणे, रेल्वे क्र. 56931 मिरज-लोंढा डेली पॅसेंजरच्या वेळेत देखील बदल करण्यात आले आहेत. ही रेल्वे आता मिरजहून सायंकाळी 5:35 वाजता निघेल आणि रात्री 10:35 वाजता लोंढा येथे पोहोचेल. या मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील आगमन/निर्गमनाच्या सुधारित वेळा पुढीलप्रमाणे आहेत. विजयनगर 5:45/5:46 वाजता, शेडबाळ 5:54/5:55 वाजता, उगार खुर्द 6:04/6:05 वाजता, कुडची 6:14/6:15 वाजता, चिंचली 6:24/6:25 वाजता, रायबाग 6:32/6:33 वाजता, चिक्कोडी रोड 6:43/6:44 वाजता, बागेवाडी थांबा

 belgaum

6:51/6:52 वाजता, घटप्रभा 7:00/7:01 वाजता, गोकाक रोड 7:11/7:12 वाजता, पारकनहट्टी थांबा 7:19/7:20 वाजता, पाच्छापूर 7:27/7:28 वाजता. सुळधाळ 7:34/7:35 वाजता, सुळेभावी 7:42/7:43 वाजता, सांबरा 7:50/7:51 वाजता, बेळगाव 8:30/8:35 वाजता, देसूर 8:49/8:51 वाजता, देसूर 8:49/20:50 वाजता, इदलहोंड थांबा 8:59/9:00 वाजता, खानापूर 9:10/9:11 वाजता आणि गुंजी 9:23/9:25 वाजता. निवृत्ती रेल्वे हुबळीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमडी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त माहिती जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.