बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या दोन मोठ्या प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
सावरकर रोडवरील एका घरात आणि हिंदवाडी येथील ‘अमित डिलक्स लॉजिंग’मध्ये झालेल्या चोऱ्यांमधील एकूण ८,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उप-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश, उप-पोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक) एन. निरंजन राजे अरस आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५८.८६० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे ५,७०,०००/- रु.), मॅट ग्रे रंगाची यामहा आर१५ मोटारसायकल (क्र. KA-22 HU-2432, अंदाजे २,५०,०००/- रु.) आणि काळ्या रंगाचा ओप्पो रेनो ७ प्रो मोबाईल (अंदाजे १०,०००/- रु.) असा एकूण ८,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.
या तपास पथकात टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी, पीएसआय (कायदा व सुव्यवस्था) विश्वनाथ घंटामठ, पीएसआय (गुन्हे व तपास) प्रभाकर डोळी आणि कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णावर, नागेंद्र तळेवार, लाडजीसाब मुलतानिकार, सतीश गिरी, अरुण पाटील यांचा समावेश होता. त्यांच्या या कार्रवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी कौतुक करून बक्षीसही जाहीर केले आहे.




