बेळगाव लाईव्ह : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टन्नावर यांची सरकारने तडकाफडकी बदली केली असून पुढील आदेशापर्यंत त्यांची बेंगलोर येथील सहकार खात्याच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शेट्टन्नावर हे 2008 बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत गेल्या काही महिन्यापूर्वी महापौर आणि एका भाजप नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा आदेश याच प्रदेश प्रादेशिक आयुक्तांनी दिला होता त्यावेळी ते चर्चेत आले होते
यासाठी मोहम्मद मोहसीन यांना समवर्ती पदभारावरून मुक्त करण्यात आले आहे, असे कर्नाटक राज्याच्या सरकारी वैयक्तिक आणि प्रशासकीय सुधारणा सेवा विभागाचे अवर सचिव टी. महांतेश यांनी कळविले आहे.

