बेळगाव लाईव्ह :रामनगरचे सुपुत्र आणि भारतीय सेनेत २४ वर्षांपासून कार्यरत असलेले शशिकांत गोसावी (वय ४५) यांचे मंगळवारी रात्री पंजाबमधील पठाणकोट येथे निधन झाले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर रामनगर येथे शो वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत गोसावी यांना दोन दिवसांपूर्वी पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
शशिकांत गोसावी यांनी भारतीय सैन्य दलात २४ वर्षे देशसेवा केली होती. अवघ्या सहा महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबीयांवर आणि संपूर्ण रामनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
गोसावी यांच्या निधनामुळे रामनगर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी आणि माजी सहकारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.





