बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला रेल्वेची धडक बसल्यामुळे तो जागीच ठार झाल्याची घटना शहरातील समर्थनगर येथे आज मंगळवारी घडली.
रेल्वेच्या ठोकरीने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी वृद्ध इसमाचे नांव पांडुरंग भातकांडे (वय 75, रा. खडक गल्ली, बेळगाव) असे आहे. अंदाज न घेता समर्थनगर येथील रेल्वे मार्ग घाईगडबडीने ओलांडण्याच्या नादात असलेल्या पांडुरंग यांना रेल्वेने धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले.
याबाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत सदर घटना घडली आहे.


