बेळगाव लाईव्ह : नृत्य समर्पित ध्येयवादी कलाकार राहुल रमेश गिते यांनी 2016 मध्ये सुरू केलेला एक उत्साही उपक्रम गेल्या दशक भरात उत्तर कर्नाटक आणि त्यापलीकडे रास गरबा, नृत्य फिटनेस आणि समुदाय सहभागाच्या क्षेत्रात एक प्रमुख नांव बनले आहे. संरचित, प्रामाणिक आणि उत्साहीपणे समृद्ध अशा स्पष्ट दृष्टिकोनासह रास गरबा कार्यशाळा घेणारी कलाकार द आर्ट्स स्टुडिओ ही प्री-सीझन गरबा प्रशिक्षण सुरू करणारी बेळगाव मधील पहिली संस्था आहे. रास गरबा नृत्याची एक अशी पद्धत जी तेंव्हापासून शहरभर समान स्वरूपांना प्रेरणा देत आहे.
बेळगावमधील आपल्या उगमापासून ‘कलाकार’ने बेंगलोर, गोवा, चंदीगड आणि दिल्लीसारख्या महानगरं आणि सांस्कृतिक केंद्रांपर्यंत आपली पोहोच हळूहळू वाढवली आहे. राहुल रमेश गिते आणि त्यांच्या समर्पित मुख्य टीमच्या नेतृत्वाखाली ब्रँडच्या कार्यशाळा, मास्टरक्लास आणि समुदाय चालित कार्यक्रमांनी त्यांच्या गुणवत्ता, उत्साह आणि प्रभावासाठी व्यापक मान्यता मिळाली आहे.
गेल्या 10 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाचा उत्सव साजरा करत असताना कलाकार द आर्ट्स स्टुडिओ आज नृत्य शिकणाऱ्या आणि उत्साही लोकांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि मागणी असलेल्या व्यासपीठांपैकी एक म्हणून उभा आहे. ज्याला सिग्नेचर रास गरबा कार्यक्रम, नाविन्यपूर्ण नृत्य फिटनेस मॉड्यूल आणि उच्च-प्रभाव मास्टरक्लासेस व सामुदायिक कार्यक्रम या गोष्टींसाठी व्यापक मान्यता आहे.
‘कलाकार’ला इतरांपासून वेगळे करणाऱ्या गोष्टी म्हणजे गरब्याचे सांस्कृतिक सार जपण्याची त्यांची वचनबद्धता, समकालीन अध्यापनशास्त्र आणि सर्वसमावेशक समुदाय सहभाग यांचा अखंडपणे समावेश करणे या होत. ही संस्था केवळ नृत्य शिक्षण देत नाही तर परंपरा, उत्सव आणि एकतेमध्ये रुजलेली चळवळ जोपासत आहे. दशकाचा टप्पा पार पाडताना कलाकार द आर्ट्स स्टुडिओ त्याच्या वाढीमध्ये आणि प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येक नर्तक, शिकणारा, सहयोगी आणि समर्थकाचे मनापासून आभार मानत आहे.
कलाकार द आर्ट्स स्टुडिओ भविष्यातील आपला वारसा वाढवण्यासाठी, नवीन शहरांमध्ये पोहोचण्यासाठी, नवीन नर्तक, कलाकारांचे स्वागत करण्याबरोबरच लय आणि हालचालींद्वारे सांस्कृतिक अभिव्यक्तीला प्रेरणा देण्यासाठी वचनबद्ध आहे. येथे एक दशकाची लय, नवीन क्षितिजे याचा एक असा वारसा आहे जो उद्देशाने वाढत राहतो आणि येणाऱ्या काळातही अनेकांना मिळतो. कलाकार द आर्ट्स स्टुडिओला भेट देण्यासाठी पत्ता : हरी मंदिराजवळ, अनगोळ मेन रोड, बेळगाव. संपर्क: 8050491986, 8073498177.


