बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर अनेक चांगल्या कामासाठी होतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हरवलेल्या वस्तू पुन्हा मूळ मालकापर्यंत परत सापडण्यात सोशल मीडियाची भूमिका आजच्या जगात महत्वपूर्ण बनली आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील सुंडी रोडवर सापडलेली कागदपत्राची बॅग बेळगाव शहरातील त्या मूळ मालकाला सुखरूप परत मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी बेळगाव सुंडी रोडवर सुजय हिरेमठ या बेळगावच्या व्यक्तीची बॅग रस्त्याशेजारी पडली होती ती बेळगाव तालुक्यातील बसुरते गावच्या दोन युवकांना मिळाली होती त्या युवकांनी सदर बॅगेबाबत फोटो आणि माहिती सोशल मीडियाच्या बेळगावच्या ग्रुप मध्ये टाकला बेळगाव वडगाव येथील अनिकेत नरगुंदकर यांच्याशी संपर्क देखील साधला अनिकेत यांनी सदर बॅगची फोटो आणि माहिती बेळगाव लाईव्ह कडे दिली.

बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून सदर बॅगेचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर प्रसिद्ध केल्यानंतर हिरेमठ या बॅगेच्या मूळ मालकाने दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला आणि अशा पद्धतीने सुंडी रस्त्यावर पडलेली महत्त्वाच्या कागदपत्रांची बेळगाव मधल्या सुजय हिरेमठ यांची बॅग त्यांना परत मिळाली.
बसूरते येथील विनोद छोटे आणि परशराम नाईक या दोन्ही लोकांनी ओळख पटवून सदर बॅग मूळ मालकाला प्रामाणिकपणे सुपूर्त केली. एकूणच सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ दुरुपयोग करण्यापेक्षा अशा चांगल्या गोष्टींचा देखील सोशल मीडियाचा उपयोग करून घेता येतोय यामधूनही अधोरेखित झाले आहे.


