कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने ग्रामीण आमदार  मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली जावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांच्यावर होत  असलेल्या कन्नड सक्तीचा  पाढाच वाचला यामध्ये  कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत काढलेल्या पतव्या पासुन गणेश उत्सवाच्या काढलेल्या फलक पर्यंतच्या घटनांनची सविस्तर माहिती दिली. या सगळ्या प्रकारांमध्ये भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकाराची तसेच संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांची कशी पायमल्ली होत आहे हे सांगितले.

आम्हाला तुम्ही विरोध समजत असाल किंवा राजकीय पार्श्वभूमीचा विचार करत असाल तर निवडणूकीचा वेळी राजकारण आणी संघर्ष करता येईल पण सध्या मतदार संघाच्या आमदार म्हणून आणी मराठी बहुभाषिक भागातून निवडून आलेल्या मराठी लोकांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देऊन न्याय दिला पाहिजे असे शुभम शेळके म्हणाले

यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर  बोलताना म्हणाल्या कायद्याच्या चौकटीत राहून यावर काय पावलं उचलता येतील ती आम्ही नक्कीच उचलू आणि संविधानाची पायमल्ली कोठेही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन युवा समिती सिमाभागच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी प्राध्यापक डॉ अच्युत माने, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, समिती नेते शिवाजी हावळाण्णाचे,महादेव पाटील,  शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, समिती नेते पिराजी मुंचडीकर, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, विजय जाधव, रमेश माळवी,अभिजित मजुकर, सागर कणबरकर ,अश्वजित चौधरी,सुनिल किरळे, 

 belgaum

अमर विठे,तात्यासाहेब कांबळे,राजकुमार मेस्त्री सतिष पाटील,किरण मोदगेकर सुरज जाधव, अभिजित कारेकर,अशोक डोळेकर,किसन सुंठकर, भागोजीराव पाटील,के.एम.कोल्हे, राजकुमार बोकडे,सागर सागावकर, यल्लाप्पा पाटील, बाबु पावशे, निलेश काकतकर,विनायक मजुकर, शिवम जाधव, जोतिबा येळ्ळूरकर,सागर कडेमनी,

आकाश कडेमनी, रमेश मोदगेकर, शामराव पाटील, मधू मोदगेकर, सचिन मोदगेकर, प्रकाश पाटील, चंद्रकांत मोदगेकर, गजानन शहापूर, मोतेश बारदेशकर,शंकर कोणेरी निरंजन जाधव, सुधीर शिरोळे, विनायक पवार,परशराय बसरीकट्टी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.