बेळगाव लाईव्ह :अस्मिता एंटरप्राइजेस संस्था निर्मित आणि राजेंद्र जैन प्रस्तुत ‘लिटिल स्ट्रायकर्स’ या हिंदी चित्रपटासाठी बाल कलाकारांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी येत्या शनिवार दि. 2 आणि रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी ऑडिशन्स घेतली जाणार आहेत.
टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल येथे घेण्यात येणारी ही ऑडिशन्स फक्त 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी असणार आहेत. ऑडिशन्सची वेळ पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वा. आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशी असणार आहे.
सदर हिंदी चित्रपट लहान मुलांच्या जीवनावर आधारित असून ज्याचे दिग्दर्शन संतोष सुतार हे करणार आहेत. तरी इच्छुकांनी आपले संपूर्ण माहिती 08197271256 अथवा 09739037858 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.




