३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

1
15
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका हेस्कॉम कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह तीन तासांहून अधिक काळ विजेच्या खांबावर लटकलेला असतानाही, हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. ही हृदयद्रावक घटना जवळील मुगळीहाळ गावात घडली.

बगरनाळ गावातील २५ वर्षीय मारुती आवळी हे हेस्कॉमचे कर्मचारी होते. मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर चढून काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या खांबावर काम करत असताना ही दुर्घटना घडली.

मारुती आवळी यांचा मृतदेह तीन तासांपेक्षा जास्त काळ खांबावर लटकलेला होता, तरीही हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी मदतीसाठी जवळ आले नाहीत. हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या या गंभीर निष्काळजीपणाविरोधात मुगळीहाळ गावातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Very sad. Where are safety measures hescom ? A youth just 25 years is gone. Action should be taken against the hescom authority for making lineman to work without safety measures.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.