बेळगाव लाईव्ह :मुळचे भांदूर गल्ली बेळगाव आणि सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले जीएसटी अधीक्षक उदय मनोहर उचगांवकर यांना मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
मुंबईत आयोजित 8 व्या जीएसटी दिन समारंभात विभागाच्या कामकाजात उत्कृष्टता आणि वचनबद्धता दाखविण्यासह समर्पित सेवांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे गेल्या मंगळवारी 1 जुलै रोजी साजऱ्या झालेल्या 8 व्या जीएसटी दिन समारंभास न्यायमूर्ती डॉ. नीला केदार गोखले, चित्रपट निर्माते बोनी कपूर जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे प्रधान मुख्य आयुक्त के.आर. उदय भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपरोक्त सत्कार याबद्दल जीएसटी अधीक्षक उदय उचगावकर यांच्यावर हितचिंतकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


