बेळगाव लाईव्ह : गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत असल्याबद्दल शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, बँकेसारख्या वित्त संस्था, सामाजिक कार्यकर्ते वगैरेतर्फे आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले.
बेळगाव शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, बँक -पतसंस्था सामाजिक कार्यकर्ते या सारख्या वित्त संस्थांचे पदाधिकारी वगैरेंनी आज शनिवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयात जाऊन शहर पोलीस आयुक्त बोरसे यांची भेट घेतली.
तसेच पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांबद्दल पोलीस आयुक्तांचे अभिनंदन करून त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

याखेरीज शहरवासीयांच्यावतीने श्रीराम सेना हिंदुस्तान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा शाल घालण्यासह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, प्रदीप अष्टेकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, राजू बिर्जे ,नारायण किटवाडकर , सुहास किल्लेकर, संजय सातेरी शरद पाटील बाळासाहेब काकतकर, दयानंद कदम, प्रशांत भातखंडे, अमोल देसाई आदी उपस्थित होते.


