बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वडगावच्या गरम देवता श्री मंगाई देवी यात्रेत प्राणी किंवा पशु बळी करण्यास बंदी घालण्यात आली आहे असा आदेश बेळगावचे जिल्ह्धिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
कर्नाटक राज्य प्राणी बळी कायदा 1959 नियम 1963 अन्वये देवाच्या नावावर प्राणी बळी देणे गुन्हा आहे. २० जुलै पासून २५ जुलै च्या दरम्यान बेळगाव वडगाव येथील श्री मंगाई मंदिर आवारात आणि वडगाव परिसरात देवीच्या नावे प्राणीबळी पशुबळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशनी यांनी हा बंदीचा आदेश बजावला आहे.
विश्व प्राणी कल्याण संघटनेचे स्वामी दयानंद यांनी जिल्हा प्रशासनाला कायदेशीर रित्या केलेल्या विलन विनंतीनुसार प्राणी बळी आणि पशु बळी बंदीचा आदेश देण्यात आला आहे.



Sihey