बेळगाव लाईव्ह : स्वेच्छा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले एन व्ही बरमनी यांचे मन वळवण्यात आले असून राज्य सरकारने त्यांना मोठं पद देऊ केलं आहे. बेळगाव शहरातील मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे त्या संदर्भात शासनाने आदेश देखील जाहीर केला आहे.
नुकताच बदली झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव शहराचे कायदा आणि व्यवस्था डीसीपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
एन व्ही बरमनी हे धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस म्हणून सेवा बजावत होते बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी हात उभारल्यानंतर ते चर्चेत आले होते आणि झालेल्या वादा नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती साठी अर्ज केला होता त्यानंतर झालेल्या वादा नंतर त्यांची राज्य सरकारकडून मनधरणी करण्यात आली आणि बेळगाव शहराचे डीसीपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीही एन व्ही बरमनी यांनी बेळगाव शहरात अनेकदा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे मार्केट पोलीस निरीक्षक मार्केट उपविभाग डीएसपी या अनेक पदावर त्यांनी बेळगावात काम केले होते आता त्यांची बेळगाव डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था पदी नियुक्ती झाली आहे.




