बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून अपमानित झालेले धारवाडचे ए.एस.पी. नारायण बरमणी यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांच्या कृतीमुळे सरकारसमोर मोठा पेच उभारल्याची चर्चा सुरु आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ए.एस.पी. बरमणी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची गोपनिय माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली असून सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अपमानामुळे अधिकारी व्यथित झाल्याचेही बोलले जात आहे.
बेळगावमधील काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अपमानित झाल्याने धारवाडचे ए.एस.पी. नारायण बरमण्णी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. बेळगावात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते.

या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेल्या नारायण बरमणी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बरमणी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसते.
आपल्या झालेल्या अपमानामुळे बरमणी यांनी हा निर्णय घेतला असून, त्यांच्या या पावलामुळे सरकारला आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार अशी चर्चा सुरु आहे.



