बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जैन पीयू कॉलेजच्या विज्ञान विभागाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी अमन वसुंधरा अभिजीत सुणगार याने नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
कर्नाटक जलतरण संघटनेतर्फे ९ ते १३ जुलै २०२५ दरम्यान बेंगळुरू येथील बसवनगुडी ॲक्वाटिक सेंटर स्विमिंग पूल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अमनने एकूण पाच पदके जिंकली.
अमनने या स्पर्धेत दोन सुवर्ण पदके, दोन रौप्य पदके आणि एक कांस्य पदक पटकावले. त्याच्या वैयक्तिक कामगिरीमध्ये १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये एक सुवर्णपदक, तर ४ X १०० मीटर मेडले रिलेमध्ये नवीन राज्य विक्रम नोंदवत आणखी एक सुवर्णपदक मिळाले. याशिवाय, २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक, ४ X २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक आणि ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत कांस्यपदक त्याने जिंकले.

जेजीआय (JGI) संस्थेचे संचालक, प्राचार्य प्रा. विश्वनाथ पाटील आणि शारीरिक शिक्षण संचालक पर्वतगौडा संकप्पनावर यांच्यासह प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी अमनच्या या प्रभावी कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला असून त्याचे अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतील या नेत्रदीपक यशानंतर अमन वसुंधरा अभिजीत सुणगारची आगामी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा ३ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान अहमदाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे.



