बेळगाव लाईव्ह :माधवपूर, वडगाव येथील बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित माधवपूर, वडगाव या संस्थेला 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या अहवाल साली 2 लाख 34 हजार 257 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून 1 लाख 52 हजार 854 रुपये इतक्या लाभांशाचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अमोल देसाई यांनी दिली.
बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित माधवपूर वडगाव या संस्थेची 2025 -26 सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून अमोल देसाई बोलत होते
. संस्थेचे अध्यक्ष देसाई यांनी ताळेबंद सादर करताना प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित माधवपूर वडगावचे 1039 सभासद असून भाग भांडवल 31 लाख 82 हजार 960 रुपये इतके आहे असे सांगितले. संस्थेचे खेळते भांडवल 2 कोटी 83 लाख रुपये, राखीव व इतर निधी 5 लाख 86 हजार 718 रुपये आणि गुंतवणूक 53 लाखांहून अधिक आहे. संस्थेकडे 1 कोटी 48 लाख 58 हजार 243 रुपयांच्या ठेवी असून यंदाच्या वर्षी 2 लाख 34 हजार 257 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.

संस्थेने एक कोटी 26 लाख 69 हजार 646 रुपयांचे सभासद कर्ज आणि 96 लाख 74 हजार रुपयांचे पीक कर्ज वितरित केले असून कर्ज वसुली समाधानकारक आहे. त्याचप्रमाणे 7 टक्क्याने 1 लाख 52 हजार 854 रुपयांचे लाभांश (डिव्हीडंट) वाटप करण्यात आला आहे अशी माहिती देऊन या एकंदर आर्थिक आढाव्यातून विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत सर्वच व्यवहार अंदाजे 25 टक्के वृद्धिंगत झाला असल्याचे अध्यक्ष अमोल देसाई यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण सभेला भागभांडवल सभासदाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.सेक्रेटरी केतन पाटील यांनी नफा विभागणी वाचन केले. रोहिणी भोसले यांनी मागील वर्षीचे इतिवृत्त वाचन केले.
संचालक संतोष शिवणगेकर यांनी वार्षिक अहवाल वाचन ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचन केले संचालिका साक्षी कणबरकर यांनी प्रारंभ उपस्थितांचे स्वागत,प्रास्तविक प्रकाश औन्धकर ,देवकुमार बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले तर करून शेवटी माधुरी बिर्जे आभार मानले.यावेळी उपाध्यक्ष तानाजी भोसले संचालक रघुनाथ जुवेकर शशिकांत पाटील लक्ष्मण बाळेकुंद्री गुरुराज शहापूरकर आदी उपस्थित होते.




