बेळगाव लाईव्ह : महापालिकेला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत आपली आणि कुटुंबीयांच्या माहिती बाबत अर्धवट माहिती दिल्या प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे तात्काळ पद रद्द करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपण्णापवर यांनी केली आहे.
बेळगाव महापालिका आयुक्त बी शुभा यांची भेट घेऊन त्यांनी सदर मागणी केली आहे. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव दोघांनी महापालिकेला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या संपत्ती बाबत अर्धवट माहिती दिली आहे.
दोघांनीही खाऊ कट्ट्यामध्ये घेतलेल्या गाळ्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नाही हे महापालिका कायदा सेक्शन 19 (1)आणि 19 (2) उल्लंघन करणारे आहे. ज्यावेळी याचे उल्लंघन केले जाते त्यावेळी राज्य सरकारला तात्काळ त्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे असे राजीव टोपण्णापवर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र लिहून यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आग्रह करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
याच धर्तीवर विजापूर मधील 35 नगरसेवकांचे पद रद्द झाले होते तशीच कारवाई बेळगावत व्हायला हवी असेही टोपण्णापवर यांचा आग्रह आहे. एकूणच बेळगाव महापालिकेच्या बाबतीत खाऊ कट्टा प्रकरण आणि नगरसेवकांचे पद रद्द बाबत एकमेकात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.


