बेळगाव लाईव्ह : खानापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर प्रभूनगरजवळ आज दुपारी भीषण अपघातात खानापूर येथील भारतीय सेनेतील जवान जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी अंदाजे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, केए 22 एचके 8494 या क्रमांकाची दुचाकी प्रभूनगर नजीक अपघातग्रस्त झाली. या अपघातात दुचाकीस्वार सुरज मोहन द्रौपदकर (वय 29, रा. मयेकर नगर, खानापूर) याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की त्याचे डोके फुटून मेंदू बाहेर आला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.
सुरज द्रौपदकर काही दिवसांपूर्वीच बदली होऊन बेळगाव येथील भारतीय सैन्य दलात सेवेत दाखल झाला होता. त्याच्या अचानक निधनामुळे खानापूर शहरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


