बेळगाव लाईव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताच्या विकासासाठी केलेल्या रचनात्मक पायाभरणीमुळे आपला देश २०२७ साली जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. शुक्रवारी येथील केएलईच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये ‘प्रयास एक्झिबिशन’च्या वतीने आयोजित केलेल्या “व्हिजन कर्नाटक २०२५” या महाप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगीच्या बीजभाषणात ते बोलत होते.
यावेळी मंचावर बेळगावचे महापौर मंगेश पवार, वेदा इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा शेट्टर, नगरसेवक श्रेयस नाकाडी, डीएफसीसीआयचे जीजीएम एस.पी. वर्मा, आयसीएमआरच्या संचालिका ज्योती भट, प्रयास एक्झिबिशनचे चेअरमन वनिश गुप्ता, संचालिका मीतू पाल आणि संचालिका ज्योतिका अरोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा शुक्रवारी शानदार समारोप झाला. पुढे बोलताना खा. शेट्टर यांनी शानदार प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल ‘प्रयास एक्झिबिशन’च्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, या प्रदर्शनाला बेळगावच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी पाच हजार, दुसऱ्या दिवशी आठ हजार आणि तिसऱ्या दिवशी सात हजार अशा तीन दिवसांत २० हजारांहून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, उद्योजक, शेतकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. एखाद्या प्रदर्शनाला एवढे लोक भेट देऊ शकतात, हे बेळगावच्या लोकांनी पहिल्यांदाच अनुभवले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी भाजप जिल्हा सेक्रेटरी नागराज पाटील यांचा खा. शेट्टर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनाला माजी आमदार महांतेश कौटगीमठ आणि जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल शिंदे यांनीही भेट देऊन विविध विभागांची माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिशा हरिकांत यांनी बसवदिक्षा तर के. दिक्षा यांनी भरतनाट्यममधून गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता देसाई यांनी केले तर आदिती सक्सेना यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मलिक, दत्ता थोरे, संतोष पवार, विनोद कुमार, मोहम्मद अफझल, राधिका चौहान, किंजल गांधी, महक इब्रानी, पुष्कर, मन्नत चावला, अनीशा यादव, अमीषा सक्सेना, मोहम्मद खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.




