बेळगाव लाईव्ह : आरसीबीने आयपीएल कप जिंकल्याच्या आनंदात सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान, एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील अवरदी गावात घडली आहे.
मूडलगी तालुक्यातील अवरदी गावातील मंजुनाथ कंबार असे मृत तरुणाचे नाव आहे.
आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कुलगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.