बेळगाव लाईव्ह:बेळगाव मार्केट पोलीस ठाण्याजवळील जुन्या भाजी मार्केट शेजारी सार्वजनिक ठिकाणी ओसी मुंबई मटका जुगाराचे नंबर घेणाऱ्या दोघा जणांना मार्केट पोलिसांनी काल रंगेहाथ पकडून अटक केली. तसेच त्यांच्या जवळील रोख 2370 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पंकज मोहन जाधव (वय 31, रा. कामत गल्ली बेळगाव) आणि मल्लेश बसवन्नप्पा माळगी (वय 60, रा. बसवेश्वरनगर, संपगाव बेळगाव) अशी आहेत.
हे दोघे स्वतःच्या लाभाकरिता जुन्या भाजी मार्केट शेजारी लोकांकडून पैसे घेऊन ते ओसी जुगारासाठी लावत होते.
याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब कुरेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून पंकज जाधव आणि मल्लेश माळगी यांना मटक्याचे नंबर घेताना रंगेहात पकडले.
तसेच त्यांच्याकडील रोख 2370 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. सदर कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाची पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे तसेच पोलीस उपायुक्तांनी प्रशंसा करून शाबासकी दिली.