बेळगाव लाईव्ह :सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी इंस्टाग्राम पोस्ट टाकल्याबद्दल एका इन्स्टाग्राम खातेदारावर मार्केट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबरोबरच मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी संबंधित इंस्टाग्राम खातेदाराला पुढील प्रमाणे नोटीस बजावली आहे. 35 (3) बीएनएसएस -2023 दखलपात्र गुन्ह्यांबद्दल : सब कलम 35(3) बीएनएसएस 2023 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला कळवत आहे की बेळगाव शहराच्या मार्केट पोलिस स्टेशनमध्ये कलम 192 बीएनएस 2023 अंतर्गत एफआयआर क्र. 98/2025 कलम 192 बीएनएस 2023 च्या अंतर्गत चौकशीदरम्यान असे दिसून आले आहे की तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर “कुराण वाचल्यानंतर बेळगावच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल बलात्कारी साकिब विरुद्ध कोणता निषेध झाला?” असे उपहासात्मकपणे अपलोड केले आहे.
ज्यातून तुम्ही विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावणारे विधान केले आहे. म्हणूनच, या प्रकरणाशी संबंधित तथ्ये आणि परिस्थिती तपासण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारण्याचे वाजवी कारण आहे. त्यासाठी तुम्हाला 4 जून 2025 रोजी ओळखपत्रासह मार्केट पोलिस स्टेशन बेळगाव शहर येथे माझ्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रत्येकाने जबाबदारीने वापर करून समाजात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे बेळगाव शहर पोलिसांनी कळविले आहे.